शारापोवाला वाइल्ड कार्डव्दारे प्रवेश | MPSC Planet

🔰 जगप्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोवाला आॅस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत वाइल्ड कार्डव्दारे प्रवेश देण्यात आला असून, ही स्पर्धा 20 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होणार आहे.

🔰 2008 मध्ये मारियाने आॅस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस ही स्पर्धा जिंकली होती. नुकत्याच झालेल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शारापोवाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते.

🔰 शारपोवाची जागतिक क्रमवारीत 147 व्या स्थानावर घसरण झाली असून मागील वर्षी दुखापतीमुळं त्रस्त असलेल्या शारापोवाला या स्पर्धेव्दारे आपली कारकिर्द सुधारण्याची संधी मिळणार आहे.

🔰 दरम्यान, आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होण्याची शारापोवाची ही 16 वी वेळ आहे.

Post a Comment

0 Comments

Close Menu