१४ जानेवारी दिनविशेष January 14 in History





डाऊनलोड पीडीएफ :







जन्मदिवस : संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण याविषयी काम करणारे कृतिशील विचारवंत, र.धों.कर्वे (१८८२), क्रिकेटमहर्षी दि.ब.देवधर (१८९२), माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख (१८९६), सिनेअभिनेत्री दुर्गा खोटे (१९०५), ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत द्वा. भ. कर्णिक (१९०८), ज्ञानपीठ आणि इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेतादेवी (१९२६), एफ१ चालक नारायन कार्तिकेयन (१९७७)
पुण्यस्मरण : धूमकेतूची कक्षा शोधणारा एडमंड हॅले (१७४२), "अॅलिस इन द वंडरलँड"चा लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल (१८९८), डॉज कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन प्रान्सिस डॉज (१९२०), कवी, लेखक आणि नाटककार जयशंकर प्रसाद (१९३७), सिनेअभिनेता हंफ्रे बोगार्ट (१९५७), कांत्स्य शिल्पकार जसुबेन शिल्पी (२०१३), हार्मोनियमवादक पं. पुरुषोत्तम वालावलकर (२०१४)
---
१७६१ : पानिपतच्या तिसऱ्या लढाईतला अखेरचा घनघोर संग्राम. विश्वासराव आणि सदाशिवरावभाऊ या मातब्बरांचा मृत्यु.
१८५७ : भारतात मिळालेली लूट ठेवून घेण्याची मुभा ईस्ट इंडीया कंपनीला देणारा हुकूम इंग्लंडच्या राजाने काढला.
१९३३ : 'बॉडीलाईन' गोलंदाजीमुळे अॉस्ट्रेलियन कप्तान बिल वुडफुलच्या हृदयावर चेंडू लागला.
१९८२ : इंदिरा गांधींनी आर्थिक सुधारणाबाबतचा २० कलमी कार्यक्रम विशद केला.
१९९३ : मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
२००४ : जॉर्जियाच्या पाच क्रॉस ध्वजला पाचशे वर्षांनंतर पुन्हा अधिकृत ध्वजाचे स्थान देण्यात आले.
२००५ : शनिचा उपग्रह टायटनवर हायगेन्स प्रोब हे अंतराळयान उतरले.
MPSC PLANET

Post a Comment

Previous Post Next Post