सुरवात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासची ..


                  
         
स्पर्धा परीक्षाची सुरवात करन्यापूर्वी आधी हे समजून घ्या की, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? ग्रॅजुएट झालेले किवा चालू असलेले जवळ पास सर्वच स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करता पण, नेमक काय करता? हेच समजत नाही..! साधे परीक्षाचा अभ्यास क्रम काय आहे हे देखील काही जणांना माहीत नाही. याचे मूळ कारण असे असेल की, त्यांना अभ्यास कसा करवा हे माहीत नसावे. या मुद्दयाचा विचार करून, हा ब्लॉग लिखाण करत आहे.

                       प्रत्येक परीक्षेला एक अभ्यासक्रम असतो; आणि हो, हा लेख स्पर्धा परीक्षा बद्दल जरी असला तरी सुद्धा कोणत्या ही परीक्षाच्या अभ्यासाचा रीत एकच असते. आपण १०वी मध्ये असताना जसा अभ्यास केलता तसा येते ही करावा लागतो, पण काही पॉइंट सोडले तर, जसे की – आपण १०वी मध्ये गोखम पट्टी केली ,काही विद्यार्थ्यानी प्रश्न विचारण्याचा कल लक्षात गेऊन अभ्यास केला. पण आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये या पेक्ष्या ही महत्वचे म्हणजे अभ्यास करन्याची गोडी ,एकता तसेच दररोज करन्याची सवय ; हा पॉइंट महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे परीक्षांचा अभ्यासक्रम प्रथम पहावा.त्यांनतर आपल्याला त्यातील किती भाग परिचयाचा आहे हे माहित होते.आपल्याला किती मेहनत घ्यावी हे समजते. काही वेळेस आपले काही विषय आवडते असल्याने त्याचा आपला चांगला अभ्यास झालेला असतो परंतु काही विषय अवघड वाटत असल्याने आपल दुर्लक्ष झालेले असते.येथे मात्र आपल्याला प्रत्येक विषयात पारंगत असणे गरजेचे असते.आपल्या कमकुवत बाजू हेरून त्यावर जास्तीत जास्त वेळ देऊन ते विषय ही मजबूत  केले तरच आपण या स्पर्धेत चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो.तर स्पर्धा परीक्षाची सुरवात नव्याने सुरवात करताना खलील प्रकारे सामोरे जावा. 

*    प्रथम अभ्यासक्रम पहा.

*    आता पर्यंत कशाप्रकारे प्रश्न आलेत त्याचे विश्लेषण करा.  यामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारण्यात येतात ?त्याची कठिण पातळी किती आहे ?प्रश्न कोणत्या विषयाचे आहेत? प्रश्न कोणत्या माध्यम  मधून विचारले गेले आहेत? उदा.शालेय पुस्तक, एनसीईआरटी पुस्तक, वर्तमानपत्र,शासनाची आणि इतर मासिके,शासनाची संकेतस्थळे इत्यादी. प्रश्न का यावेळी विचारला गेला असेल? उदा.एखाद्या विषयाला 25 वर्ष झाली असतील तर त्या संदर्भात प्रश्न विचारला असू शकतो. अशाप्रकारे विश्लेषण करावे.   

*    त्यानंतर त्या विषयासाठी कोणतेही सर्व अभ्यासक्रम कव्हर केले असलेले एक पुस्तक घ्या.

*    प्रत्येक विषयाला किती दिवस देता येतील या प्रमाणे नियोजन करा.शेवटी परिक्षेगोदर उजळणी साठी वेगळे दिवस बाजूला ठेवा.

 (साधारणतः 20 ते 30 दिवस)

*    ज्या विषयाचा अभ्यास करणार आहात तोच विषय अभ्यासाला घ्या आपण जेवढे दिवस नियोजनाला दिले आहेत तेवढे दिवस त्या विषयाला द्यावा. अभ्यास करताना जर तुम्हाला कंटाळा आला तर मग तुम्ही चालू घडामोडी चा अभ्यास करा. अथवा गणित बुद्धिमत्ता चा पण अभ्यास करू शकता . एकच विषय केल्याने चांगली लिंक लागते.

*    आता एक-एक टॉपिक घेऊन त्यावर आलेले प्रश्न पहा. आता असे टॉपिक नुसार मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणारे पुस्तके उपलब्ध आहेत.त्यानंतर त्या टॉपिक चे शालेय पुस्तकातील टॉपिक वाचा .नंतर रेफेरन्स पुस्तकातून तो टॉपिक वाचा. येथे फक्त वाचणे हे अपेक्षित नाही तर ते आत्मसात होणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या टॉपिक वर काही चालू घडामोडी विषयक बाब असेल तर चालू घडामोडी मासिक अथवा पुस्तकातून ते आपल्या नोट्स मध्ये नोंदवा. नोट्स काढलेल्या कधीही उत्तम .परंतु नोट्स या खूप जास्त मोठ्या नसाव्यात नाहीतर परिक्षेगोदर उजळणी करताना कोणतेही दडपण येऊ नये. 

*    अभ्यास करताना मनातल्या मनात प्रश्न तयार करण्याची सवय लावा.त्यामुळे आपली एकाग्रता वाढते. आणि परीक्षेत काही गोंधळून टाकणारे प्रश्नांना सामोरे जाता येते. प्रत्येक टॉपिक नंतर प्रश्न सोङवा कारण हि ऑब्जेकटिव  प्रकाराची परीक्षा आहे. जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढेल. मला एवढे एवढे मार्क मिळायलाच हवेत तर च मी पास होईल हा विचार काढून टाका.कट-ऑफ किती लागेल याचा विचार अत्ताच नका करू. चांगल्या प्रकारे परीक्षा  कशी  देता येईल याचा विचार करा.

*    आपण जो टॉपिक केला आहे त्यावर त्याच दिवशी रिवीजन करा. त्यामुळे तो टॉपिक चांगला होतो.

*    आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आणखी एखाद रेफरानस पुस्तक वाचायला घेऊ शकता. अथवा एखादा टॉपिक चांगल्या प्रकारे दुसऱ्या पुस्तकात दिला असेल तर तुम्ही जरूर त्यातून तो पूर्ण करा.   

*    अभ्यास करताना मनाची एकाग्रता चांगली असणे गरजेचे आहे .त्यामुळे अभ्यास करताना तुमचे मन विचलीत करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहा. उदा-सोशल मीडिया, ज्या विषयाची चर्चा कधीच संपणार नाहीत अशा विषयावर चर्चा, कोणत्याही सामाजिक अथवा राजकीय संघटनेचे सदस्य होणे.

*    अभ्यास करताना तुमचे मन हे मोकळे असने गरजेचे आहे, त्यामुळे इतर प्रॉब्लेम  निपटून अभ्यासाला लागा. अभ्यास एक त्रास म्हणून नका करू. जर असे असेल तर तुम्ही प्रशासनात पण काम करताना त्रास  म्हणून काम कराल. नुकताच महेंदसिंह धोनी चित्रपट आला त्यामध्ये बिहार विरुध पंजाब मॅच  मध्ये बिहार ने ३५७ रन केले.मॅच च्या तिसऱ्या दिवसाच्या आदल्या रात्री बिहार चे खेळाडू युवराज सिंह ला पाहतात आणि कसला भारी प्लेअर आहे म्हणतात.धोनीच्या मते आम्ही मॅच त्याच क्षणी हरलो. आणि युवराजने ३५८ रन केले. त्याचप्रमाणे जर हा अभ्यास त्रास वाटत असेल,खूप अवघड वाटत असेल अथवा खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही लढाई तेथेच हरली असणार.

*    अभ्यासा बरोबर मनाची स्थिरता पण असने गरजेचे आहे त्यासाठी दररोज योगा ,र्ंनिग, ध्यानधारणा करायला हवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःशी संवाद साधायला हवा. जेणेकरून आपल्याला प्रगती करता येईल. लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षामध्ये खरी स्पर्धा तुमची स्वतःशीच आहे. शक्यतो अभ्यास दिवसा करा आणि रात्र जागरण टाळा. अवघड विषय जर तुम्ही दिवसा हातळले तर सोपे होऊन जातील. कधीही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका - स्पर्धा परिक्षा ही तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे.             

t.me/mpscplanet

               ब्लॉग वाचल्या बद्दल धन्यवाद ..!

               -  स्वप्नील कनकुटे(बीई-मेक.) 

 अधिक नोट्स व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी खालील संकेतस्थळाना अवश्य भेट द्या..       

               Visit us at   

 www.kankuteswapnil.blogspot.in         

 

    Join us on Facebook


 

                  Contact us

                    Swapnilk.abd@gmail.com     

 

 

© वरील माहिती कॉपीराइट कायद्याअंतर्गत बनवली आहे, तरी या नोट्सचा विक्री साठी उपयोग करता येणार नाही. -  स्वप्नील कनकुटे

Post a Comment

0 Comments

Close Menu